संयुक्त राष्ट्राच्या एका मोठ्ये अधिकार्याने गांधीजींवर टीका केल्यामुळे भारत सरकार ने त्याचे सडेतोड उत्तर दिले आहे. नवी दिल्ली येथे शुक्रवारी युनायटेड नेशन चे विशेष अधिकारी लियो हेल्लर ह्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोडी ह्यांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या कमतरता सांगत म्हटले कि आता महात्मा गांधींच्या चष्म्याला ( स्वच्छ भारत अभियानाचे मानचिन्ह) मानव अधिकारांच्या लेन्स ने बदलण्याची वेळ आलेली आहे. ह्यावर केंद्र सरकार कडून उत्तर देतांना म्हटले आहे कि युएन अधिकाऱ्याने केलेली टीका आमचे राष्ट्रपिता गांधी च्या प्रती खूपच असंवेदनशील आहे. हेल्लर म्हणाले कि लोकांना शौचालय तर उपलब्धझाले आहेत परंतु अजूनही अनेक लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध झालेले नाही. त्यावर सरकारने उत्तर दिले की हेल्लरने हे सर्वेक्षण फक्त आठवड्यात केले आहे, आणि भारतासारख्या विशालकाय देशाचे सर्वेक्षण फक्त दोन आठवड्यात करून टीका करणे सर्वासी चुकीचे आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews